आकार यशोत्सव नागपूर 2018

आकार यशोत्सव 2018 नागपूर : MPSC व UPSC यशवंत.. कर्तृत्ववान महाराष्ट्रवीरांचा गौरव सोहळा नागपूर येथे दि. 2 सप्टेंबर 2018 ला संपन्न !

न्यायमूर्ती मा.सुनील शुक्रे (न्यायाधीश, उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर) यांच्या शुभहस्ते UPSC व MPSC यशवंतांचा व त्यांचे आई-वडील यांचा प्रेरणादायी सत्कार समारंभ कविवर्य सुरेश भट, सभागृह, रेशीमबाग, नागपूर येथे संपन्न !

“स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल गुणवत्तेसह संयम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा ! मा.ह्रिषीकेश मोडक IAS( अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नागपूर)
यांचे मत !

आकार फाउंडेशन द्वारा आयोजित नागपूर व अमरावती विभागातील UPSC व MPSC मधील यशवंत व त्यांचे आई-वडिल यांच्यासह हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भरगच्च सभागृहात रंगला शानदार गौरव सोहळा !

सनदी व राज्यसेवेतील प्रशासकीय अधिकारी यांनी “सामान्य माणसाचा सार्वांगीण विकास” हे ध्येय ठेऊन सामाजिक जाणीव व समाजभान जोपासत काम करावे व त्यासाठी भारतीय संविधानाचा अभ्यास करावा कारण भारतीय संविधान “आपण सर्व एक आहोत ही जाणीव करून देत समाजाप्रती काम करण्याची जाणीव निर्माण करण्याची क्षमता भारतीय संविधानात आहे” असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर चे न्यायमूर्ती मा.सुनील शुक्रे यांनी केले.

मा.ह्रिषीकेश मोडक म्हणाले की, “यशाप्रमाणे अपयश पचवण्याची सवय आपल्याला लावावी लागेल. कारण UPSC व MPSC परीक्षा uncertain आहेत, यश मिळायला वेळ लागू शकतो त्यामुळे संयमाने व सातत्याने अभ्यास करणे अपेक्षित आहे. आणि स्पर्धा परीक्षेत पद मिळवल्यानंतर हुरळून जाता कामा नये. पद मिळाल्यानंतर आपली जबाबदारी अधिक वाढते. कारण डाग न लागता समाजाची सेवा करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आपण असतो. शुद्ध हेतूने काम केल्यास ते आपोआप यशस्वीरीत्या पूर्ण होते. इच्छाशक्ती, बौद्धिक क्षमता, कठोर परिश्रम, अपयश पचवण्याची शक्ती आपल्या यशात गरजेच्या असतात.”

“देशाच्या किंवा राज्याच्या प्रशासनात आपले कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक युवकांची गरज आहे त्यामुळे लवकरात लवकर सहकारी म्हणून प्रशासनात या !” असेही आवाहन ह्रिषीकेश मोडक IAS यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना करून विविध प्रेरणादायी उदाहरणे देत आत्मविश्वास वाढवणारे मार्गदर्शन केले.

आकार फाउंडेशन नागपूर च्या वतीने स्पर्धा परीक्षांत (केंद्र व राज्य लोकसेवा अयोग) यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आदिवासी विकास विभाग आयुक्त मा.ह्रिषीकेश मोडक IAS, मुंबई विद्यापीठ विधी विभागाचे संचालक मा.डॉ.अशोक येंडे, क्रीडा अधिकारी मा.हर्षल हिवरकर, आकार फाउंडेशनचे संस्थापक-संचालक राम वाघ, पुणे आकार फाउंडेशनचे व्यवस्थापक प्रवीण मुंढे, आकार फाउंडेशन चे इतर सर्व पदाधिकारी व प्राध्यापक आदी उपस्थित होते.

समारंभाचे प्रमुख पाहुणे मा.न्यायाधीश सुनील शुक्रे व आदिवासी विकास विभागाचे आयुक्त मा.ह्रिषीकेश मोडक IAS, डॉ.अशोक येंडे यांचे हस्ते सर्वप्रथम आकार फाउंडेशनच्या नवीन UPSC MPSC मार्गदर्शन व अभ्यासिका केंद्राचे उदघाटन आणि “आकार स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान 2019” नोंदणी चे उद्घाटन करण्यात आले. या अभियानाद्वारे नागपूर, अमरावती, पुणे व औरंगाबाद या चार विभागातून दरवर्षी प्रवेश परीक्षेद्वारे निवड झालेल्या प्रत्येक विभागातून 300 गरीब व होतकरू विद्यार्थ्याना एक वर्षाचे UPSC व MPSC चे मोफत व सवलतीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. पुढील 2019 वर्षांसाठी नागपूर, अमरावती, पुणे व औरंगाबाद विभागातून प्रत्येकी 300 याप्रमाणे 1200 विद्यार्थ्यांची UPSC व MPSC मार्गदर्शनासाठी निवड केली जाईल अशी माहिती प्रास्ताविकाद्वारे आकार फाउंडेशनचे संचालक राम वाघ यांनी दिली.

डॉ.अशोक येंडे यांनी विविध सकारात्मक उदाहरणाद्वारे विद्यार्थ्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असावा असे आवाहन केले. यावेळी यशवंत व त्यांचे आई-वडील यांचा प्रेरणादायी सत्कार करण्यात आला त्यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

राम वाघ यांनी स्वागत-प्रास्ताविकाद्वारे “आकार फाउंडेशन हे गरीब व वंचित विद्यार्थ्यांसाठी स्थापन झालेली संस्था आहे व त्याचं दिशेने गुणवत्ता व प्रामाणिकतेने सर्वोत्तम मार्गदर्शनाचे काम अविरत सुरू राहील असा विश्वास व्यक्त केला.” यशोत्सवात उपस्थित यशवंतांपैकी काही यशवंतांची प्रेरणादायी मनोगते झाली, यशोत्सवाला सुमारे 2200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली आणि विशेष महत्वाचे म्हणजे सकाळी 11 ते सायंकाळी 4.30 वा. पर्यंत चाललेला हा समारंभ अद्वितीय प्रेरणा व यशस्वी करिअर ची नवी उमेद जागविणारा ठरला. सर्व यशवंतांचे हार्दिक अभिनंदन !
प्रा.स्मिता खंगाई यांनी यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले. डॉ.नितल भोला यांनी आकार फाउंडेशन च्या UPSC व MPSC कोर्स च्या अकॅडेमिक व्यवस्थापनाची माहिती दिली. किशोर गज्जलवार BDO यांनी आभार मानले.

आकार यशोत्सवाचे निमंत्रण स्वीकारून समारंभाला उपस्थित सर्व मान्यवरांचे मन:पूर्वक आभार, मोठ्या संख्येने उपस्थित नागपूर व अमरावती विभागातील विद्यार्थी मित्रांचे आकार फाउंडेशन मध्ये स्वागत. सर्व यशवंतांना पुढील प्रशासन व लोककल्याणकारी कर्तव्यनिष्टेच्या व यशस्वी वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा.

आकार यशोत्सव समारंभासाठी उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन करून एक शानदार प्रेरणादायी समारंभ यशस्वी केल्याबद्दल आकार फाउंडेशन नागपूर सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन..जय हो !

X