About Us

 

आमची उद्दिष्टे

उत्तुंग भरारी घेण्याची अफाट..अफाट ताकद, प्रचंड ऊर्जा, भन्नाट उत्साहात नव्या उमेदीने नव्या वैभवाचे यशस्वी स्वप्न साकारण्याचा निर्धार व शपथ घेतांना युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक माहिती, वातावरण, प्रेरणा, प्रोत्साहन, सहाय्य, मार्गदर्शन, संसाधने उपलब्ध करवून देणे हा आमचा मूळ उद्देश.

मन, मनगट व मेंदुने सामर्थ्यवान असलेली युवा शक्ती हीच देशाची खरी संपत्ती आहे आणि म्हणुन तरुणांच्या एकत्रित शक्तीसारखीच त्यांची विचारधाराही तेव्हडीच प्रबळ असली पाहिजे..!

या मायभूमीत घडला पाहिजे महोत्सव चीरतरुण मनांचा व त्यात नित्य स्मरणा-या प्रगतीच्या विचारांचा आणि संपन्नतेचा …!

  • ग्रामीण भागातील तरुणांमधील स्पर्धा परीक्षाबाबतचा न्युनगंड, मरगळ नष्ट होऊन आत्मविश्वास व उत्साह संचारावा.
  • स्पर्धा परीक्षाद्वारे प्रशासकीय अधिकारी होऊन उत्तुंग भरारी घेण्यासाठी त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे.
  • UPSC / MPSC स्पर्धा परीक्षांसाठी गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाची यंत्रणा उभारून त्या माध्यमातून फक्त श्रीमंतच नव्हे तर आर्थिक दुर्बल, गरीब होतकरू विद्यार्थ्यांनाही संधी उपलब्ध करून देणे.
  • यातून सकारात्मक, कर्तव्यदक्ष व प्रामाणिक युवा पिढी घडविणे.

माझ्या महाराष्ट्राच्या मायभूमीतील शहरी व मुख्यतः ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांसाठी UPSC / MPSC / BANKING इ. स्पर्धा परीक्षांचे गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन व शिक्षण हे ध्येय स्विकारून १९ फेब्रुवारी २००९ हा लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी “आकार फाउंडेशन”ची स्थापना केली कारण शहरी भागासह विशेषतः ग्रामीण भागातील विध्यार्थी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनापासून वंचित होते, याचे मुख्य कारण होते उपलब्ध न होणारी आवश्यक माहिती, वातावरण, प्रेरणा, प्रोत्साहन, अभ्यास साहित्य, गुणवत्तापुर्ण मार्गदर्शन व काहींची प्रतिकूल परिस्थिती. अश्या परिस्थितित धडपडणाऱ्या तरुणाईला नवी प्रेरणादायी दिशा, दृढता व प्रकाश दाखवून आकार देण्याचे कार्य आकार फाउंडेशनच्या माध्यमातून अहोरात्र कष्ट करण्याचा संकल्प करून आम्ही सर्वांनी मिळून उभारले आहे. UPSC , MPSC इ. स्पर्धा परिक्षांविषयी प्रेरणा, जाणिव व जागृती निर्माण व्हावी, स्पर्धा परीक्षांचे स्परूप समजावे, विध्यार्थ्यांच्या मनातील स्पर्धा परीक्षाविषयींचे गैरसमज दूर व्हावेत आणि भविष्यात सक्षम प्रशासकिय अधिकारी होण्याच्या दृष्टीने त्याचे पाऊल पडावे व जनकल्याणासाठी समर्पणाने, कर्तव्यदक्षपणे कार्य करणारा कार्यकती अधिकारी आकाराला यावा यासाठी आकार फाउंडेशनच्या माध्यमातून (१) स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व मार्गदर्शन ,(२) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा (३) स्पर्धा परीक्षा जागृती अभियान. (४) आकार स्पर्धा परीक्षा प्रेरणा, आत्मविश्वास व शिष्यवृत्ती अभियान. (५) आकार अभ्यास महोत्सव (Officer of the weak). (६) आकार अभ्यासिका (२४ x ७). (७)आकार गुरुकुल. (८) आकार प्रकाशन व बुक डीस्ट्रीब्युटर्स. (९) आकार स्पर्धा परीक्षा करियर व साहित्य संम्मेलन. (१०) आकार याशोत्सव (UPSC / MPSC इ. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या यशवंतांचा व त्यांच्या आई – वडिलांचा प्रेरणादायी सत्कार समारंभ). इ. प्रकल्पाच्या माध्यमातून शहरी भागापासून ते ग्रामीण विशेषतः दुर्गम आदिवासी भागापर्यंत आकार फाउंडेशनचे अविरत कार्य सुरु आहे. आजपर्यंत आकारच्या ४७७ हून अधिक विद्यार्थ्यांची राज्यात व देशात प्रशासकीय व अधिकारी व २००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची इतर पदांवर निवड झाली आहे. ही तर सुरवात आहे, समृद्ध भारत निर्माणासाठी व महाराष्ट्रात करियर क्रांती घडविण्यासाठी, एकजुटीने उत्तुंग भरारी घेऊन या भारत मातेचे खरे आधारस्तंभ होण्यासाठी परिवर्तनाच्या व क्रांतीच्या आजच्या युगात तरुणांनो आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी एकत्र या, आपले जीवनातले ध्येय निश्चित करा, व ते ध्येय साध्य करण्यासाठी आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा व आत्मभान ठेवून आपल्या स्वत:तील आत्मशक्तीने, प्रचंड जिद्दीने व आत्मविश्वासाने जीवनातील अद्वितीय यश संपादित करता येते यावर विश्वास ठेवा आणि आपण यशस्वी झाल्यावर ती यशस्वीतेची ज्वलंत प्रेरणा ज्योत आपल्या बांधवांच्या हाती द्या, कर्तुत्वाची व यशाची ही ज्योत विझता कामा नये ही आपली सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे याकरिता आपल्याला सर्वांना एकत्र यावे लागेल…

त्यासाठी, “अशी कशी धरणीची माय ममता आटली, कशी चोरूनिया पान्हा, माय वैरीण झाली…जाती धर्माचे झेंडे बुडवू पाण्यात, शोधू माणूस माणूस दगडाच्या ढीगा-यात….!” या विदर्भाच्या सडेतोड प्रबोधन करणा-या कवयत्री बहिणाबाई चौधरी यांच्या अनमोल विचारांचे स्मरण ठेवावे लागेल “आपण जर सर्व एकत्र आलात तर या महाराष्ट्रात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही…!”

” मी जनसेवेसाठी व राष्ट्र निर्माणासाठी प्रशासकीय अधिकारी होणार…! ”

    

pic

राम श्रीकृष्ण वाघ

शिक्षण : M.A. English, History, Public Administration, D.Ed., B.Ed.M.Phil

MPSC द्वारे निवड

PSI व राज्य गुप्तवार्ता अधिकारी (वर्ग -II) पदासाठी निवड

2003 ते 2016 : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मध्ये अध्यापक म्हणून कार्य

 

19 फेब्रुवारी 2009 ला छ. शिवाजी महाराज जयंतीदिनी आकार फाउंडेशन या सेवाभावी शैक्षणिक संस्थेची स्थापना.

1 फेब्रुवारी 2016 ला अध्यापक पदाचा राजीनामा देऊन दि. 19 फेब्रुवारी 2016 पासून आकार फाउंडेशन, नागपूर येथे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत.

महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेची गुणवत्तापूर्ण अभ्यास चळवळ सुरू करण्यासाठी महाराष्ट्रात विशेतः विदर्भात नागपूर व अमरावती येथे 150 प्रशासकीय अधिकान्यांचे रचनात्मक संघटन करून आकार फाउंडेशनच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शनाचे कार्य व गाव तिथे अभ्यासिका या ग्रामीण भागात यशस्वी झालेल्या प्रकल्पाचे संस्थापक.

आकार स्पर्धा परीक्षा प्रेरणा व करिअर जागृती अभियाद्वारे 1392 हून अधिक व्याख्यानातून संपूर्ण महाराष्ट्रात 100,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व करिअरचे प्रेरणादायी मार्गदर्शन व समुपदेशन.

आकार स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती योजनेद्वारे दरवर्षी 200 अत्यंत गरीब, होतकरूनिराधार व अपंग विद्यार्थ्यांना विनामूल्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व दरवर्षी 3500 ते 4000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आकार फाउंडेशनच्या केंद्रांमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व प्रशिक्षण.

आकार यशवत आकार फाउंडेशनच्या 500 हून अधिक विद्यार्थ्यांची देशात व राज्यात प्रशासकीय अधिकारी 3000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची इतर पदांवर निवड.

आकार यशोत्सवः कर्तृत्ववान महाराष्ट्रवीरांचा गौरव सोहळा या यशवंतांच्या प्रेरणादायी कार्यक्रमाचे संयोजक.

गाव तिथे अभ्यासिका प्रकल्प : ग्रामीण भागात अभ्यास संस्कृती रुजविण्यासाठी तालुका व गाव स्तरावर एकुण 32 अभ्यासिका केंद्र यशस्वीरित्या लोकसहभागातून सुरू केले.

स्पर्धा परीक्षांचे (UPSC MPSC/BANKING/SSC) करिअर मार्गदर्शक व करिअर समुपदेशक.

प्रेरणादायी व्याख्याते मार्गदर्शक 10 वी, 12 वी व पदवी नंतरचे यशस्वी करिअर यावर प्रेरणादायी व्याख्याने.

आकार स्पर्धा परीक्षा अभ्यास महोत्सव – यशवंत प्रशासकीय अधिकारी व लेखक यांच्या कार्यशाळांचे नियमित आयोजन.

आकार स्पर्धा परीक्षा करिअर व साहित्य संमेलनाचे दरवर्षी आयोजन.

प्रगट मुलाखत प्रशिक्षक व करिअर मार्गदर्शक म्हणून कार्य.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, कर्मवीर भाऊराव पाटील इ. महापुरूषांच्या जीवन चरित्राचे प्रेरणदायी वक्ते, व्याख्याते.