Our Features

आकार फाउंडेशनची वैशिष्ट्ये

स्वावलंबी अभ्यास पद्धती + परीक्षाभिमुख मार्गदर्शन + युनिट टेस्ट द्वारे मूल्यमापन = आकार पॅटर्न

आकार पॅटर्न नोट्स : टीम आकार फाउंडेशनच्या मार्गदर्शकांनी तयार करून संस्कारित केलेल्या UPSC व MPSC च्या अपडेटेड नोट्स

TEST : प्रत्येक घटकावर Worksheet व पूर्ण अभ्यासक्रमावर आयोगाप्रमाणे Test Series व त्यावर Feedback Sessions

मार्गदर्शक : पूर्ण वेळ तज्ज्ञ मार्गदर्शक, अतिथी प्रशासकीय अधिकारी व लेखक यांच्या विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन

बॅचेस : UPSC/MPSC/BANKING/SSC च्या नियमित बॅचेस व विकेंड बॅचेस तसेच पोस्टल कोर्सेस उपलब्ध

आकार अभ्यासिका : ग्रामीण भागात गाव तिथे अभ्यासिका प्रकल्प अ) जिल्हास्तर ब) तालुका स्तर क) गावस्तर

समृद्ध ग्रंथालय व आकार अभ्यासिका (AAKAR STUDY FORAM) : एकूण 33 अभ्यासिका केंद्रे

AAKAR DISTRIBUTIONS : सर्व स्पर्धा परीक्षा प्रकाशनाची सर्व पुस्तके विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलतीच्या दरात उपलब्ध

आकार प्रकाशन : आकार प्रकाशनाची गुणवत्तापूर्ण दर्जेदार पुस्तके राज्यातील सर्व विक्रेत्यांकडे सवलतीत उपलब्ध

आकार स्पर्धा परीक्षा करिअर व साहित्य संमेलनाचे दरवर्षी आयोजन

आकार स्पर्धा परीक्षा व करिअर जागृती अभियान : 2013 पासून

आकार पॅटर्न

UPSC/ MPSC आणि एकंदरीत सर्व स्पर्धा परीक्षांचा विशाल अभ्यासक्रम आणि प्रश्नांची काठिण्यपातळी लक्षात घेता विद्यार्थ्यांनी स्वतःची आकलन क्षमता विकसित करणे अत्यावश्यक ठरते. राज्य सेवा परीक्षेतील CSAT चा सिंहाचा वाटाही दुर्लक्षित करून चालत नाही. किंबहुना CSAT पेपरमधील उताऱ्यांचे उत्तमरीत्या आकलन करता आल्यास अर्धी लढाई फत्ते ! अर्थातच विद्यार्थ्यांची आकलन क्षमता व निर्णय क्षमता वाढविणारा पॅटर्न म्हणजे आकार पॅटर्न.
शिक्षक शिकवतील तरच अभ्यास हा प्रकार आता कालबाह्य ठरतोय. मग विद्यार्थ्यांनी स्वतःचा अभ्यास स्वतःच एखाद्या तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली करणे शक्य नाही काय? या प्रश्नाचे नेमके उत्तर म्हणजे आकार पॅटर्न. सर्व विषयांचे नियोजन बॅचच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची हाती. प्रत्येक तासिकेच्या टॉपिकचे वाचन आदल्याच दिवशी, त्यावर आधारित दररोज टेस्ट आणि त्यानंतर तज्ज्ञांचे मार्गदर्शन. दररोज अध्ययन – दररोज मूल्यमापन, येथे तज्ज्ञांची भूमिका शिक्षकाची कमी आणि मार्गदर्शकाची जास्त असेल. अजून बरीच वैशिष्ट्ये आहेत. जे अनुभवताहेत ते ग्वाही देतीलच. महत्वाचे एवढेच, विद्यार्थी अध्ययन करतील आणि त्यांना मार्गावरून भटकू न देण्याची काळजी घेईल आकार फाउंडेशन. नवीन काही नसलं तरी जुन्याचीच सुधारित, शिस्तबद्ध व पारदर्शक अंमलबजावणी म्हणजे आकार पॅटर्न.

X