Director’s Desk

From The Director’s Desk

‘समृद्ध भारत निर्माण’ हे ध्येय स्वीकारून महाराष्ट्राच्या मायभूमीतील व विशेषत्वाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचा संकल्प करून 19 फेब्रुवारी 2009 ला प्रजाहितदक्ष लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी आकार फाउंडेशन या स्वयंसेवी शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. कारण महाराष्ट्राच्या विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थी आजही स्पर्धा परीक्षांच्या योग्य मार्गदर्शनापासून वंचित आहेत, याची मुख्य कारणे म्हणजे उपलब्ध न होणारी स्पर्धा परीक्षांची आवश्यक माहिती, वातावरण, प्रेरणा, प्रोत्साहन, अभ्यास साहित्य, मार्गदर्शकांची कमतरता व अनेकांची प्रतिकूल परिस्थिती. अशा परिस्थितीतील नव तरुणाईला योग्य करिअर मार्गदर्शनासह  प्रेरणादायी दिशा, दृढता व प्रकाश दाखवून ‘आकार’ देण्याचे कार्य आकार फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी मिळून उभारले आहे.
आकार फाउंडेशनच्या स्थापनेपासूनच UPSC, MPSC, BANKING, SSC इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात संस्थेने गुणवत्तापूर्ण कामाने यशस्वी ठसा उमटविला आहे. स्पर्धा परीक्षेची परीक्षाभिमुख तयारी, पूर्व व मुख्य परीक्षेतील सर्व विषयांचे सखोल व सविस्तर  मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचे वैयत्तिक कौन्सिलिंग, अद्ययावत व दर्जेदार नोट्स, वर्कशीट, यशवंत अधिकाऱ्यांशी परिसंवाद, भरपूर घटक चाचण्या,  UPSC, MPSC आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे पूर्व, मुख्य परीक्षांचे सराव पेपर व गुणवत्तापूर्ण अभ्यास सत्रांसोबत दररोज सर्वंकष मूल्यमापन आणि अधिकारी पदावर निवड होईपर्यंत संपूर्ण  मार्गदर्शन व मदत या ‘आकार पॅटर्न’ मुळे आजपर्यंत संस्थेतून मार्गदर्शन घेतलेल्या 603 विद्यार्थ्यांची राज्यात व देशात प्रशासकीय अधिकारी व 3000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची इतर पदांसाठी निवड झाली आहे. म्हणूनच ‘आकार फाउंडेशन’ स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील महाराष्ट्रातील दर्जेदार संस्था म्हणून नावारूपास आली आहे.
गरीब व प्रतिकूल परिस्थितीतील विद्यार्थ्यांनासुद्धा आर्थिक परिस्थिती सुदृढ असलेल्या विद्यार्थ्यांसारखे दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी आकार फाउंडेशन द्वारे दरवर्षी प्रत्येक विभागातून 300 गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षेद्वारे निवड केली जाते व त्यांना मोफत व सवलतीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले जाते. गुणवत्ता असलेल्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत व सवलतीत शिक्षण आणि आर्थिक परिस्थिती सुदृढ असलेल्या विद्यार्थ्यांना कमीत कमी फी मध्ये दर्जेदार शिक्षण संस्थेद्वारे उपलब्ध करुन दिले जात आहे.
ग्रामीण भागात ‘गाव तिथे अभ्यासिका’ हा आकार फाउंडेशनचा प्रकल्पसुद्धा अत्यंत यशस्वी ठरला असून गाव,  तालुका व जिल्हा स्तरावर संस्थेद्वारे 33 अभ्यासिका केंद्र यशस्वीरीत्या चालविले जात असून या माध्यमातून ग्रामीण भागात करिअर जागृती व स्पर्धा परीक्षा अभ्यास संस्कृती विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
स्पर्धा परीक्षा अभ्यासाचा दृढनिश्चय असलेल्या विद्यार्थ्यांनी ‘यावे ज्ञान व सक्षमीकरणासाठी आणि निघावे देशसेवेसाठी’ या यशस्वी ‘आकार पँटर्न’ चा महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.
देशातील सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासात सनदी सेवेतील व राज्य सेवेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे आवश्यकता आहे ती गुणवत्ता व कौशल्य असलेल्या सुजाण व संवेदनशील अधिकाऱ्यांची व असे कर्तव्यदक्ष अधिकारी घडविण्यात व ‘समृद्ध भारत निर्माणाचे ध्येय’ यशस्वी करण्यात संस्था कार्यमग्न आहे.
राम वाघ
संस्थापक, संचालक
आकार फाउंडेशन

राम श्रीकृष्णराव वाघ

 • संस्थापक, संचालक : आकार फाउंडेशन पुणे, नागपूर. 
 • शिक्षण : M.A. English, History, Public Administration, D.Ed., B.Ed., M.Phil (Education)
 • UPSC : Interview : 1 time, UPSC Mains : 2 attempt
 • MPSC द्वारे निवड : PSI व राज्य गुप्तवार्ता अधिकारी (वर्ग -II)
 • 2003 ते 2016 : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत अध्यापक म्हणून  कार्य/सेवा
 • UPSC व MPSC : स्पर्धा परीक्षांचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून 2009 पासून मार्गदर्शनाचे काम.
 • 19 फेब्रुवारी 2009 ला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी आकार फाउंडेशन या सेवाभावी शैक्षणिक संस्थेची स्थापना.
 • 1 फेब्रुवारी 2016 ला अध्यापक पदाचा राजीनामा देऊन दि. 19 फेब्रुवारी 2016 पासून आकार फाउंडेशन, पुणे व नागपूर येथे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत.
 • महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेची गुणवत्तापूर्ण अभ्यास चळवळ सुरू करण्यासाठी महाराष्ट्रातील 150 प्रशासकीय अधिकाऱ्यांचे रचनात्मक संघटन करून आकार फाउंडेशनच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शनाचे कार्य व गाव तिथे अभ्यासिका या ग्रामीण भागात यशस्वी झालेल्या प्रकल्पाचे संस्थापक.
 • स्पर्धा परीक्षा प्रेरणा व करिअर जागृती अभियानाद्वारे 1600 हून अधिक व्याख्यानाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात 1, 50,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व करिअरचे प्रेरणादायी मार्गदर्शन.
 • आकार फाउंडेशन द्वारे स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती योजनेद्वारे दरवर्षी 300 अत्यंत गरीब, होतकरू निराधार व अपंग विद्यार्थ्यांना मोफत व सवलतीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व दरवर्षी 3500 ते 4000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आकार फाउंडेशनच्या केंद्रांमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व प्रशिक्षण.
 • गाव तिथे अभ्यासिका प्रकल्प : ग्रामीण भागात अभ्यास संस्कृती रुजविण्यासाठी गाव, तालुका व जिल्हा स्तरावर एकुण 33 अभ्यासिका केंद्र यशस्वीरित्या लोकसहभागातून सुरू केले.
 • UPSC, MPSC, BANKING, SSC स्पर्धा परीक्षांच्या मुलाखतीचे प्रगट मुलाखत प्रशिक्षक/मार्गदर्शक.
 • प्रेरणादायी वक्ते/व्याख्याते : 10 वी, 12 वी व पदवी नंतर काय ?, स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, म. ज्योतिबा फुले, राजर्षी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, कर्मवीर भाऊराव पाटील इ. महापुरूषांच्या जीवन चरित्राचे प्रेरणादायी वक्ते/व्याख्याते.