Vision & Mission

Our Vision

 • शिक्षणातून चिंतनशील व सुजाण समाज निर्माण करणे.
 • ग्रामीण महाराष्ट्रातील तरुणांमधील नैराश्य दूर करून त्यांना सर्वांगीण विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी  करणे.
 • तरुणांमध्ये आत्मविश्वास वाढवून रोजगारांच्या विविध संधी उपलब्ध करून देणे.
 • समाजातील सर्व घटकांना, गोरगरीब, वंचित-उपेक्षित, अपंगांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करुन देणे.
 • विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची रचनात्मक यंत्रणा ग्रामीण भागात उपलब्ध करून देणे.

Our Mission

 • भारतीय प्रशासकीय सेवेत महाराष्ट्रातील तरुणांचे प्रमाण वाढविणे.
 • महाराष्ट्र राज्य प्रशासनात महाराष्ट्रातील ग्रामीण तरुणांचे प्रमाण वाढविणे.
 • सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक सर्व विषयांचे गुणवत्तापूर्ण  व दर्जेदार अभ्यास साहित्य निर्मिती करणे.
 • गाव तिथे अभ्यासिका‘ प्रकल्पातून समाजात वाचनसंस्कृती व अभ्याससंस्कृती रुजविणे.
 • स्पर्धा परीक्षांना पोषक वातावरण तयार करून स्पर्धा परीक्षा अभ्यास संस्कृती रुजविणे व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची रचनात्मक यंत्रणा उपलब्ध करणे.
 • प्रतिकूल परिस्थितीतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, साधारण आर्थिक परिस्थितीतील विद्यार्थ्यांना सवलतीत शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या विद्यार्थ्यांना कमीतकमी फी मध्ये गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देणे.